29 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरस्पोर्ट्सटीम इंडियाचे ५ ‘गेमचेंजर्स’!

टीम इंडियाचे ५ ‘गेमचेंजर्स’!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत मैदानात उतरणार आहे. आगामी मालिकेत काही खेळाडूंसाठी ही मालिका विशेष महत्त्वाची ठरणार असून, त्यांच्या कामगिरीवर निवडकर्त्यांसह क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील.

वैभव सूर्यवंशी

अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळल्यानंतर वैभव आता अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करताना कशी फलंदाजी करतो, याकडे विशेष लक्ष असेल.

झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात वैभवने ८१ धावांची तुफानी खेळी केली होती. दलीप ट्रॉफीतही त्याने चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असेल.

जसप्रीत बुमराह

अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ब्रेकनंतर टी-२० संघात पुनरागमन करत आहे. त्याने मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

बुमराह आपल्या नेहमीच्या लयीत दिसला, तर अफगाणिस्तानच्या फलंदाजांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये त्याची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

संजू सॅमसन

संजू सॅमसनसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांत त्याला केवळ ५ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांतही तो केवळ २८ धावा करू शकला.

त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करत टी-२० संघातील आपले स्थान मजबूत करण्याची संधी सॅमसनसमोर असेल.

रवि बिश्नोई 

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत रवि बिश्नोईने प्रभावी गोलंदाजी केली होती. त्याने विकेट्स मिळवण्यासोबतच धावांवरही नियंत्रण ठेवले.

अफगाणिस्तानच्या संघातही दर्जेदार फिरकीपटू असल्याने भारतीय फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बिश्नोईला या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील आपले स्थान आणखी मजबूत करण्याची संधी आहे.

नितीश कुमार रेड्डी 

हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डीवरही मोठी जबाबदारी असणार आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नितीशला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे.

ऑलराउंडर म्हणून संघासाठी प्रभावी योगदान देण्यात तो कितपत यशस्वी ठरतो, हे मालिकेतील महत्त्वाचे आकर्षण असेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा