31 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरस्पोर्ट्सPSL मध्ये परवानगीशिवाय भारतीय वंशाच्या अग्नि चोप्राच्या नावाने खळबळ

PSL मध्ये परवानगीशिवाय भारतीय वंशाच्या अग्नि चोप्राच्या नावाने खळबळ

लिलावासाठी नोंदणीच केलेली नसल्याचं अग्नि चोप्राकडून स्पष्टीकरण

Google News Follow

Related

पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ साठी होणाऱ्या आगामी खेळाडू लिलावाच्या अधिकृत नोंदणी यादीत युवा क्रिकेटपटू अग्नि देव चोप्राचं नाव परदेशी खेळाडू म्हणून नोंदवण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. अग्नि चोप्रा हा शिकारा आणि १२थ फेल यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माता विधु विनोद चोप्रा आणि ‘धुरंधर’ चित्रपटाच्या नकारात्मक समीक्षेमुळे चर्चेत आलेल्या समीक्षक अनुपमा चोप्रा यांचे पुत्र आहेत. ही यादी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अग्नि चोप्रा याने स्वतः स्पष्टीकरण देत आपण PSL लिलावासाठी नोंदणीच केलेली नसल्याचं सांगितलं असून, या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. २७ वर्षीय डावखुरा फलंदाज असलेला अग्नि चोप्रा, पीसीबीच्या यादीत अमेरिकेचं (USA) प्रतिनिधित्व करणारा खेळाडू म्हणून दाखवण्यात आला आहे. पीसीबीच्या दस्तऐवजांनुसार, त्यांची बेस प्राईस ६०,००,००० पाकिस्तानी रुपये (सुमारे १९.६ लाख रुपये किंवा २१,५२० अमेरिकी डॉलर्स) निश्चित करण्यात आली आहे. या यादीत त्याला डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफ-स्पिन गोलंदाज म्हणून नमूद करण्यात आलं आहे.

पीसीबीची यादी समोर आल्यानंतर अग्नि चोप्रा याने इंस्टाग्रामवर निवेदन जारी करत म्हटलं, “एका स्पर्धेबाबत माझ्या नावाने खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी स्पष्ट करू इच्छितो की मी PSL साठी कोणतीही नोंदणी केलेली नाही. माझं संपूर्ण लक्ष अमेरिकेतील माझ्या क्रिकेट प्रवासावर आणि दीर्घकालीन करिअर उद्दिष्टांवर आहे. कृपया कोणीही चुकीच्या माहितीला बळी पडू नये.”

हे ही वाचा:

भारत आणि मलेशियामध्ये अनेक महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

हिंदुत्व म्हणजे सुरक्षेची हमी…सरसंघचालक मोहनराव भागवतांनी दिला संदेश

भारत–अमेरिका व्यापार कराराला मोठी चालना

गाझियाबाद तीन बहिणींचा मृत्यू: वडिलांच्या २०१५ च्या लिव्ह- इन पार्टनरने केली होती आत्महत्या

पीसीबीने जाहीर केलेल्या यादीत एकूण ८७९ क्रिकेटपटू लिलावासाठी उपलब्ध असून, त्यामध्ये ४९१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांसारख्या देशांमधून आहेत. PSL २०२६ (सीझन ११) ही लीग विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण यंदा ड्राफ्ट प्रणालीऐवजी लिलाव पद्धत स्वीकारण्यात आली आहे. तसेच किंग्समेन हैदराबाद आणि सियालकोट स्टॅलियन्स या दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या सहा संघांमध्ये इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्स, लाहोर कलंदर्स, मुल्तान सुल्तान्स, पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा