29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरस्पोर्ट्सअजित आगरकरना मुदतवाढ की नवे निवडसमिती प्रमुख?

अजित आगरकरना मुदतवाढ की नवे निवडसमिती प्रमुख?

बीसीसीआयसमोर नव्या मुख्य निवडकर्त्याचा प्रश्न

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपल्या पदावर पुढे कायम राहण्याची इच्छा नसल्याची माहिती मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून नव्या मुख्य निवडकर्त्याचा शोध सुरू होण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांचा सध्याचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपणार आहे. आगरकर यांनी जुलै २०२३ मध्ये भारतीय पुरुष संघाच्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

दरम्यान, बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वरिष्ठ निवड समितीच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. आगरकर यांना मुदतवाढ द्यायची की त्यांच्या जागी नव्या मुख्य निवडकर्त्याची नियुक्ती करायची, याबाबत आता बीसीसीआयचे पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मात्र आगरकर यांच्या भवितव्याबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. “अजून १५ दिवस बाकी आहेत. क्रिकेटच्या जगात १५ दिवस हा मोठा कालावधी असतो. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगरकर यांच्या पुढील भूमिकेबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या कार्यकाळात भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाची कामगिरी केली. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर २०२४ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० विश्वचषक जिंकला. २०२५ मध्ये भारताने न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवले. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये भारताला काही कठीण निकालांचाही सामना करावा लागला.

हे ही वाचा:

तीन बड्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसचे दरवाजे बंद!

ग्रीनलँडच्या सुरक्षेवर अमेरिकेचे ‘कायमस्वरूपी नियंत्रण’!

परीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

निकेत कौशिक यांनी घेतले करूळकरांच्या विघ्नहर्त्याचे दर्शन

आगरकर यांच्या जागी नव्या मुख्य निवडकर्त्याचा शोध सुरू असताना माजी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल आणि माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. नव्या निवडकर्त्याच्या नियुक्तीसाठी मंडळाकडून पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा