30 C
Mumbai
Tuesday, September 22, 2026
घरविशेषपरीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

परीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

आयआयटी मुंबईतील धक्कादायक घटना

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबई येथील नामांकित भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या एका विद्यार्थ्याने गुरुवारी संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साहिल वाकोडे अशी मृत विद्यार्थीची ओळख असून हा ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी परीक्षा सुरू असताना हा विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन वापरताना आढळला होता. त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर (ChatGPT) अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकारानंतर प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली नव्हती. संबंधित विषयाचे शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याचे समुपदेशन केले होते, तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्याला दिला होता.

हे ही वाचा:

निकेत कौशिक यांनी घेतले करूळकरांच्या विघ्नहर्त्याचे दर्शन

तिरुपती लाडू प्रकरणी ‘सुकृती फूड्स’च्या प्रवर्तकाला अटक

रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ

मराठमोळ्या ‘गोंधळ’ची यंदा ऑस्करवारी

समुपदेशनानंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला. मात्र, संध्याकाळच्या सुमारास तो खोलीत मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याच्या निधनाबद्दल आयआयटी मुंबई प्रशासनाने तीव्र शोक व्यक्त केला असून मृताच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत. या धक्कादायक प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा