30.5 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरविशेषमराठमोळ्या ‘गोंधळ’ची यंदा ऑस्करवारी

मराठमोळ्या ‘गोंधळ’ची यंदा ऑस्करवारी

ऑस्करच्या शर्यतीत मराठी सिनेमाचा डंका

Google News Follow

Related

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी या निवडीची घोषणा केली. देशभरातून आलेल्या ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली असून, आता हा चित्रपट ऑस्करच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ लोककलेभोवती गुंफलेले कथानक हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील एका रात्रीत घडणाऱ्या घटनांमधून नातेसंबंध, मानवी भावना, इच्छा, मत्सर, फसवणूक आणि सामाजिक वास्तव यांचा वेध चित्रपट घेतो. पारंपरिक संस्कृतीला थ्रिलर कथानकाची जोड देत दिग्दर्शक संतोष डावखर यांनी ही कथा प्रभावीपणे मांडली आहे.
हे ही वाचा:
दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!

पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वामध्ये मशिदीत नमाजावेळी स्फोट

हार्दिक अजून पूर्ण फिट नाही!

टेकबॉलमध्ये क्विमसीची उपांत्य फेरीत धडक; पदकापासून एक विजय दूर

चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘गोंधळ’चा प्रीमियर २०२५ मध्ये गोव्यात झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया येथे झाला होता. या चित्रपटासाठी संतोष डावखर यांना सिल्व्हर पीकॉक पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरणारा ‘गोंधळ’ हा चौथा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे ‘गोंधळ’च्या निवडीने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आता ऑस्करच्या पुढील प्रक्रियेत ‘गोंधळ’ची शॉर्टलिस्ट आणि अंतिम नामांकनासाठी निवड होते का, याकडे देशभरातील चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा