28 C
Mumbai
Saturday, September 19, 2026
घरविशेषमुंबई-गोवा महामार्गाचा खर्चात साडेपाच हजार कोटींची वाढ

मुंबई-गोवा महामार्गाचा खर्चात साडेपाच हजार कोटींची वाढ

१७ वर्षांनंतरही काम अपूर्णच

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा खर्च तब्बल ४८ टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. ३५५ किलोमीटरच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुरुवातीला ११ हजार ४९९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता प्रकल्पाची किंमत वाढून १६ हजार ९०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी देऊन तब्बल १७ वर्षे उलटली असतानाही महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

या प्रकल्पातील काही पॅकेजच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परशुराम घाट ते आरावली या टप्प्यासाठी सुरुवातीला ९८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, आता या कामाची किंमत २ हजार २२६ कोटी रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या एका पॅकेजच्या खर्चात तब्बल १२६ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढत्या खर्चासोबतच प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कालावधीही सातत्याने लांबत गेल्याने या कामाच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा:
मराठमोळ्या ‘गोंधळ’ची यंदा ऑस्करवारी

दीड फुटांचा बाप्पा… भक्ती मात्र आभाळाएवढी!

हार्दिक अजून पूर्ण फिट नाही!

एशियन गेम्समध्ये भारतीय महिला उपांत्य फेरीत

मुंबई आणि कोकणाला जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने त्याचे चौपदरीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. अपूर्ण कामे, अरुंद रस्ते, अपूर्ण पूल आणि विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास त्यामुळे अनेकदा अपेक्षेपेक्षा कितीतरी तासांनी लांबतो.

या महामार्गाच्या कामासाठी आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा खर्च झालेला असताना प्रकल्प अद्याप पूर्ण न झाल्याने वाढत्या खर्चाचा भार आणि रखडलेल्या कामांची जबाबदारी याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यातील समृद्धी महामार्गासारखा मोठा प्रकल्प तुलनेने कमी कालावधीत पूर्ण झाला असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला एवढा प्रदीर्घ काळ का लागला, याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे वाढलेला खर्च, रखडलेली कामे आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, याकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा