29.1 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्सऑस्ट्रेलिया नॉकआउट फेरीत!

ऑस्ट्रेलिया नॉकआउट फेरीत!

Google News Follow

Related

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेतील ग्रुप ‘डी’मधील ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे यांच्यातील सामना गोलरहित बरोबरीत संपला. मात्र या एका गुणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने गटात दुसरे स्थान कायम राखत ‘राउंड ऑफ ३२’मध्ये आपले स्थान निश्चित केले. आता ४ जुलै रोजी डॅलसमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना ग्रुप ‘जी’मधील उपविजेत्या संघाशी होणार आहे.

दुसरीकडे, पॅराग्वेला गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे नॉकआउट फेरीतील भवितव्य आता इतर गटांतील निकालांवर अवलंबून राहणार आहे. स्पर्धेच्या नियमानुसार सर्व गटांतील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम आठ संघांना ‘राउंड ऑफ ३२’मध्ये प्रवेश मिळणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने चेंडूवरील नियंत्रण राखत आक्रमक खेळ केला. जॉर्डन बोस, एडेन ओ’नील आणि क्रिस्टियन वोल्पाटो यांनी उजव्या बाजूने प्रभावी चढाया करत पॅराग्वेच्या बचावफळीवर सातत्याने दबाव निर्माण केला. चौथ्याच मिनिटाला वोल्पाटोच्या अचूक पासवर जॅक्सन इर्विनला गोलची सुवर्णसंधी मिळाली होती, मात्र ती दवडली गेली.

पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने अनेक गोलच्या संधी निर्माण केल्या, परंतु पॅराग्वेच्या भक्कम बचावामुळे त्यांना यश मिळाले नाही. ३६व्या मिनिटाला जॉर्डी बोसने आणखी एक धोकादायक चढाई केली, तर अतिरिक्त वेळेत इर्विनचा हेडर थोडक्यात गोलपोस्टच्या बाहेर गेला. पहिल्या सत्रात पॅराग्वेला केवळ एकच शॉट मारता आला आणि तोही लक्ष्यभेद करण्यात अपयशी ठरला.

उत्तरार्धात पॅराग्वेने अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारला. युवा खेळाडू जुलिओ एन्सिसोने ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीची कसोटी पाहिली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव करत संघाला पिछाडीवर जाण्यापासून वाचवले.

सामन्याच्या अखेरीस दोन्ही संघांनी काही बदल केले. ऑस्ट्रेलियाकडून टेटे येंगी आणि पॉल ओकोन-एंगस्टलर मैदानात उतरले, तर पॅराग्वेकडून मौरिसियोने गोलचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही संघांच्या शिस्तबद्ध बचावामुळे अखेर सामना ०-० अशा गोलरहित बरोबरीत संपुष्टात आला.

या निकालामुळे ऑस्ट्रेलियाने नॉकआउट फेरीतील आपले तिकीट निश्चित केले, तर पॅराग्वेला पुढील फेरीची आशा कायम ठेवण्यासाठी इतर गटांच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा