31 C
Mumbai
Friday, April 3, 2026
घरस्पोर्ट्स‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर अक्षर पटेल नाराज

‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर अक्षर पटेल नाराज

Google News Follow

Related

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या नियमामुळे ऑलराउंडर खेळाडूंची भूमिका कमी होत असल्याचं त्याचं मत आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अक्षर म्हणाला,
“खरं सांगायचं तर मला हा नियम अजिबात आवडत नाही. मी स्वतः ऑलराउंडर आहे. आधी संघात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी ऑलराउंडर निवडला जायचा. पण आता या नियमामुळे संघ व्यवस्थापन वेगळा फलंदाज किंवा गोलंदाज निवडतं आणि ऑलराउंडरची गरजच भासत नाही.”

तो पुढे म्हणाला,
“गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मला एका ठराविक भूमिकेत पाहिलं नाही. संघाला जे हवं असेल, ती भूमिका मी निभावतो. त्यामुळेच मला ‘क्रायसिस मॅन’ असं म्हटलं जातं. कधी फिनिशर, कधी मधल्या फळीतील फलंदाज — संघाच्या गरजेनुसार मी स्वतःला बदलतो.”

अक्षरने संघभावनेवर भर देताना सांगितलं,
“कधी एखादा खेळाडू दोन चेंडूत चार धावा करतो, तर कधी दोन चेंडूत बारा धावा करतो, किंवा ओपनर म्हणून ऐंशी धावा करतो — या सगळ्या भूमिका संघासाठी महत्त्वाच्या असतात. मी नेहमी याच विचाराने मैदानात उतरतो की, संघाला जे हवंय तेच करायचं.”

तो म्हणाला,
“जर तुम्हाला अपेक्षित गोष्ट मिळाली नाही, तर निराशा आणि राग येतो, आणि त्याचा परिणाम खेळावर होतो. म्हणून मी नेहमी संघाच्या गरजेला प्राधान्य देतो. त्यासाठी तयार राहिलात, तर तुम्ही शंभर टक्के देऊ शकता.”

विशेष म्हणजे, अक्षरने यापूर्वीही या नियमावर टीका केली होती. २०२४ मध्ये उपकर्णधार असताना त्याने सांगितलं होतं की, ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे त्याच्या फलंदाजीच्या क्रमावर परिणाम झाला होता. आयपीएलमध्ये हा नियम २०२३ पासून लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, आयपीएल २०२६ हंगामात दिल्ली कॅपिटल्स आपला पहिला सामना १ एप्रिल रोजी इकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा