29 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरस्पोर्ट्सऑस्ट्रेलियात तिहेरी शतक झळकावणारे पहिले क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं निधन

ऑस्ट्रेलियात तिहेरी शतक झळकावणारे पहिले क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं निधन

Google News Follow

Related

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टेस्ट क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारे पहिले फलंदाज बॉब काउपर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून आजारी असलेले काउपर यांचे निधन रविवारी झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डेल आणि दोन मुली ओलिविया आणि सेरा असा परिवार आहे.

बॉब काउपर हे एक प्रतिभावान डावखुरे फलंदाज म्हणून ओळखले जात होते. संयम, तंत्र आणि मोठ्या डावासाठी ओळखल्या जाणाऱ्या काउपर यांची सर्वात लक्षवेधी खेळी १९६६ साली इंग्लंडविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होती, जेव्हा त्यांनी ३०७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. ही खेळी ऑस्ट्रेलियात टेस्ट क्रिकेटमधील पहिले तिहेरी शतक ठरली आणि याच कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने त्या वर्षी अ‍ॅशेस मालिका देखील जिंकली.

काउपर यांनी १९६४ ते १९६८ या कालावधीत ऑस्ट्रेलियासाठी २७ टेस्ट सामने खेळले आणि ४८.१६ च्या सरासरीने २०६१ धावा केल्या, ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन व्यवसायिक क्षेत्रात प्रवेश केला.

विक्टोरिया राज्याकडून खेळताना त्यांनी ८३ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि संघाच्या यशस्वी प्रवासात मोलाची भूमिका बजावली. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी आयसीसीच्या सामना निरीक्षक (Match Referee) पदाची जबाबदारी सांभाळली, तसेच अनेक क्रिकेटपटूंना सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ सन्मानाने गौरवले होते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन माईक बेयर्ड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, “बॉब काउपर हे एक विलक्षण फलंदाज होते. एमसीजीवर त्यांनी साकारलेले तिहेरी शतक कायम आठवणीत राहील. त्यांनी १९६० च्या दशकात ऑस्ट्रेलियन आणि विक्टोरियन संघांसाठी मोठे योगदान दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रती मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा