29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरस्पोर्ट्सरोनाल्डोचा ऐतिहासिक गोल

रोनाल्डोचा ऐतिहासिक गोल

पोर्तुगालची प्री-क्वार्टर फेरीत दमदार एन्ट्री!

Google News Follow

Related

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पोर्तुगालने क्रोएशियावर २-१ अशी नाट्यमय मात करत प्री-क्वार्टर फेरी (राऊंड ऑफ १६) गाठली. या सामन्यात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीतील पहिलाच गोल नोंदवत इतिहास रचला. ४१ वर्षीय रोनाल्डोसाठी हा गोल विशेष ठरला, कारण तब्बल सहा विश्वचषक खेळल्यानंतर प्रथमच त्याला बाद फेरीत गोल करण्याची संधी साधता आली.

टोरोंटो येथे झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. क्रोएशियाने दुसऱ्या हाफमध्ये इव्हान पेरिसिचच्या गोलच्या जोरावर आघाडी घेत पोर्तुगालवर दबाव निर्माण केला. मात्र काही मिनिटांतच पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. व्हीएआरच्या मदतीने रेफ्रीने निर्णय कायम ठेवला आणि रोनाल्डोने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात धाडत सामना १-१ असा बरोबरीत आणला. या गोलानंतर रोनाल्डोचा आनंद आणि जल्लोष पाहण्यासारखा होता.
हे ही वाचा:
बिसूरमध्ये मशिदीशेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना प्रचंड त्रास

सोफी एक्लेस्टोनचा विश्वविक्रम!

श्री तुळजाभवानीदेवीच्या जमीन महाघोटाळ्याच्या चौकशीचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

ध्रुव राठीच्या वादग्रस्त व्हिडिओबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या!

सामना अतिरिक्त वेळेकडे झुकत असताना ९०+४ व्या मिनिटाला गोंसालो रामोसने राफाएल लेओच्या अप्रतिम पासवर हेडरद्वारे निर्णायक गोल झळकावला आणि पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणी क्रोएशियाने पुन्हा गोल करत बरोबरी साधल्याचा आनंद साजरा केला होता, मात्र व्हीएआर तपासणीनंतर तो गोल ऑफसाइड ठरवण्यात आला. त्यामुळे पोर्तुगालचा विजय निश्चित झाला, तर क्रोएशियाच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.

या विजयासह पोर्तुगालने विश्वचषकाच्या शेवटच्या १६ संघांमध्ये स्थान मिळवले असून आता त्यांचा सामना बलाढ्य स्पेनशी होणार आहे. रोनाल्डोच्या ऐतिहासिक गोलामुळे आणि अखेरच्या क्षणी मिळालेल्या या थरारक विजयामुळे पोर्तुगालच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखालील क्रोएशियाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा