30.7 C
Mumbai
Friday, June 19, 2026
घरस्पोर्ट्समेक्सिकोचा जल्लोष, कोरियाचे स्वप्न भंगले!

मेक्सिकोचा जल्लोष, कोरियाचे स्वप्न भंगले!

दक्षिण कोरियाला नमवत नॉकआउट फेरीत सर्वप्रथम प्रवेश

Google News Follow

Related

यजमान मेक्सिकोने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आपली दमदार कामगिरी कायम ठेवत दक्षिण कोरियावर १-० अशी मात केली आणि स्पर्धेच्या बाद फेरीत (राऊंड ऑफ ३२) प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. ग्वाडालाहारा येथील अॅक्रोन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मेक्सिकोने संयमी आणि आक्रमक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच मेक्सिकोने चेंडूवरील नियंत्रण राखत दक्षिण कोरियाच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. मात्र, कोरियन संघानेही तितक्याच ताकदीने प्रतिकार केल्याने पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. बचावफळीच्या भक्कम खेळीमुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

दुसऱ्या सत्रात मात्र मेक्सिकोने खेळाचा वेग वाढवला आणि ५०व्या मिनिटाला सामन्याचा निर्णायक क्षण आला. गुटिएरेजच्या अचूक थ्रू बॉलवर धावत आलेल्या लुईस रोमोने शानदार फिनिशिंग करत चेंडू जाळ्यात धाडला. या गोलने स्टेडियममधील हजारो मेक्सिकन चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला.

गोल स्वीकारल्यानंतर दक्षिण कोरियाने आक्रमणांची मालिका सुरू केली. अखेरच्या काही मिनिटांत त्यांनी बरोबरी साधण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र, मेक्सिकोचा गोलरक्षक रेंगल भक्कम भिंत ठरला. विशेषतः सामन्याच्या अखेरच्या क्षणी त्याने सलग दोन जबरदस्त बचाव करत दक्षिण कोरियाची आशा संपुष्टात आणली.

या विजयासह मेक्सिकोने ग्रुप ‘अ’मध्ये अव्वल स्थान निश्चित केले असून विश्वचषक २०२६ च्या बाद फेरीत पोहोचणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे मेक्सिकोने सलग दोन सामने एकही गोल न स्वीकारता जिंकले आहेत. यजमान देश म्हणून अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी १९९८ च्या विश्वचषकात फ्रान्सने आपल्या घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.

आता मेक्सिकोची नजर विश्वचषकाच्या बाद फेरीतही हीच विजयी लय कायम राखण्यावर असणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा