32 C
Mumbai
Thursday, March 12, 2026
घरस्पोर्ट्सअभिषेक शर्मा अव्वलच; ईशान किशन दुसऱ्या स्थानी, संजू सॅमसनची मोठी झेप

अभिषेक शर्मा अव्वलच; ईशान किशन दुसऱ्या स्थानी, संजू सॅमसनची मोठी झेप

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) टी-२० फलंदाजांची नवी रँकिंग जाहीर केली असून भारताचा डावखुरा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे. तर ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी या रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रँकिंगनुसार अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर कायम आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सुरुवातीला खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या अभिषेकने अंतिम सामन्यात २१ चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीमुळे त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले.

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या ईशान किशनने ९ सामन्यांच्या ९ डावांत ३१७ धावा केल्या. त्याला रँकिंगमध्ये २ स्थानांची बढती मिळाली असून तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-२० रँकिंग आहे. ईशानने अंतिम सामन्यात २५ चेंडूत ५४ धावांची झंझावाती खेळी केली होती.

पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. इंग्लंडचा फिल सॉल्टही एक स्थान गमावून चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा पाथुम निसांका पाचव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज टिम सायफर्टने ४ स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर मजल मारली आहे. भारताचा तिलक वर्मा एक स्थानाने घसरून सातव्या स्थानावर, तर डेवाल्ड ब्रेविस आठव्या स्थानावर आहे.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा विश्वचषकात बॅटने फारसा प्रभाव दिसला नाही. त्यामुळे त्याला २ स्थानांचा फटका बसला असून तो आता नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जोस बटलर एक स्थान घसरून दहाव्या क्रमांकावर आला आहे.

याशिवाय भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शतक ठोकणाऱ्या इंग्लंडच्या युवा फलंदाज जेकब बेथेलने १७ स्थानांची झेप घेत १६व्या स्थानावर प्रवेश केला आहे. फिन अॅलनने ७ स्थानांची झेप घेत २०वे स्थान मिळवले आहे.

तर टी-२० विश्वचषकातील भारताचा हिरो ठरलेला संजू सॅमसनने तब्बल १८ स्थानांची मोठी झेप घेत २२व्या स्थानावर मजल मारली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा