27.2 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरस्पोर्ट्सश्रीकांतचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा हुकले

श्रीकांतचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा हुकले

Google News Follow

Related

भारताचा माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याचे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला चायनीज तैपेईच्या सु ली-यांगकडून १५-२१, २१-१६, ९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

३३ वर्षीय श्रीकांतने आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एक तास नऊ मिनिटे रंगलेली लढत दिली. दुसरा गेम जिंकत त्याने सामन्यात पुनरागमन केले, मात्र निर्णायक तिसऱ्या गेममध्ये त्याला आपला खेळ कायम राखता आला नाही.

२०१७ फ्रेंच ओपननंतर श्रीकांतला अद्याप बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. पराभवानंतर श्रीकांत म्हणाला, “मी करत असलेली मेहनत योग्य दिशेने जात आहे. आता महत्त्वाच्या क्षणी गुण जिंकणे गरजेचे आहे. सु ली-यांगने निर्णायक क्षणी उत्कृष्ट खेळ केला.”

दोन्ही खेळाडूंमध्ये यापूर्वी दोन सामने झाले होते आणि दोघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला होता. मे महिन्यात झालेल्या थायलंड ओपन स्पर्धेतही सु ली-यांगने श्रीकांतचा पराभव केला होता.

अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सु ली-यांगने सुरुवातीपासून आघाडी घेत २१-१५ असा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने दमदार पुनरागमन करत २१-१६ ने विजय मिळवून सामना बरोबरीत आणला.

मात्र निर्णायक तिसऱ्या गेममध्ये श्रीकांत थकलेला दिसला. त्याचा फायदा घेत सु ली-यांगने सलग गुणांची कमाई करत २१-९ असा गेम जिंकला आणि कारकिर्दीतील पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद आपल्या नावावर केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा