27.4 C
Mumbai
Thursday, July 2, 2026
घरस्पोर्ट्समेक्सिकोचा १९८६ नंतर नॉकआऊट फेरीतील पहिला विजय

मेक्सिकोचा १९८६ नंतर नॉकआऊट फेरीतील पहिला विजय

फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये इक्वाडोरला नमविले

Google News Follow

Related

सह-यजमान मेक्सिकोने फिफा विश्वचषक २०२६ च्या प्री-क्वार्टर फायनल (राउंड ऑफ-१६) फेरीत दमदार प्रवेश केला. बुधवारी मेक्सिको सिटी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मेक्सिकोने इक्वाडोरचा २-० असा पराभव केला. ज्युलियन क्विनोनेस आणि राऊल जिमेनेझ यांनी पहिल्या हाफमध्ये गोल करत संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह मेक्सिकोने तब्बल ४० वर्षांनंतर विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत विजयाची नोंद केली.

१९८६ नंतर मेक्सिकोचा हा पहिलाच विश्वचषक नॉकआऊट सामना होता. विशेष म्हणजे, त्या वर्षीही मेक्सिको यजमान होता आणि त्यांनी बल्गेरियाचा २-० असा पराभव केला होता. आता २०२६ मध्येही त्याच फरकाने विजय मिळवत मेक्सिकोने इतिहासाची पुनरावृत्ती केली. तसेच, १९९० मध्ये इटलीनंतर विश्वचषकातील पहिले चारही सामने जिंकणारा मेक्सिको हा पहिला यजमान देश ठरला आहे.

खराब हवामानामुळे सामना एक तास उशिराने सुरू झाला, मात्र त्याचा मेक्सिकोच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. सुरुवातीपासूनच संघाने आक्रमक खेळ केला. दुसऱ्या हाफमध्ये इक्वाडोरकडे चेंडूवरील अधिक नियंत्रण होते, पण मेक्सिकोच्या भक्कम बचावफळीने त्यांना कोणतीही संधी दिली नाही. सलग चौथ्या सामन्यातही मेक्सिकोने एकही गोल स्वीकारला नाही.

हे ही वाचा:

रशियाची भारताकडे पेट्रोल पुरवठ्याची मागणी

राम मंदिर देणगी चोरी; आरोपीने पैसे स्वच्छतागृहात लपवून बाहेर नेले

जूनमध्ये जीएसटीचा विक्रमी महसूल

हा प्रयोग भारतासाठी गेम चेंजर ठरणार…

सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांतच गिल्बर्टो मोरा, लुईस रोमो, राऊल जिमेनेझ आणि मोरा यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या. दुसरीकडे, १८व्या मिनिटाला इक्वाडोरच्या जॉन येबोआचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यानंतर चार मिनिटांनी ज्युलियन क्विनोनेसने दमदार फटका मारत मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

गिल्बर्टो मोरा (१७ वर्षे २५९ दिवस) हा विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत सामना सुरू करणारा पेलेनंतरचा दुसरा १७ वर्षीय आणि दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला. पेले यांनी १९५८ मध्ये वेल्सविरुद्ध ब्राझिलकडून खेळताना १७ वर्षे २३९ दिवसांचे असताना ही कामगिरी केली होती.

रॉबर्टो अल्वाराडो यांनी अप्रतिम पास देत क्विनोनेसला संधी निर्माण करून दिली. क्विनोनेस स्वतःच्या अर्ध्यातून वेगाने धावत पुढे गेले आणि पेनल्टी बॉक्समधून जोरदार फटका मारत इक्वाडोरचा गोलरक्षक हर्नान गालिंडेज यांना कोणतीही संधी दिली नाही.

पहिला गोल केल्यानंतर क्विनोनेस थांबले नाहीत. पहिल्या हाफच्या अर्ध्या तासानंतर त्यांनी उत्कृष्ट पास देत राऊल जिमेनेझकडून दुसरा गोलही करवून घेतला. दुसरीकडे, सीझर मॉन्टेस आणि जोहान वास्केझ यांनी बचावफळीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आणि कॉर्नरवर हेडरद्वारे गोल करण्याच्या जवळही पोहोचले. गोलरक्षक राऊल रेंगल यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत सलग चौथ्या सामन्यात क्लीन शीट राखली.

‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरलेल्या ज्युलियन क्विनोनेस म्हणाले, “आज आमच्या संघभावनेमुळे हा विजय शक्य झाला. संपूर्ण संघ चांगला खेळला तरच एखादा खेळाडू चमकू शकतो. हीच आमची विचारसरणी आहे. आम्हाला सतत लढत राहायचे आहे. आयुष्यही हेच शिकवते की, ध्येय गाठेपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”

आता मेक्सिकोचा सामना ६ जुलै रोजी मेक्सिको सिटी स्टेडियमवर इंग्लंड आणि डीआर काँगो यांच्यातील राउंड ऑफ-32 सामन्याच्या विजेत्या संघाशी होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा