29.9 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरस्पोर्ट्ससिंधूची विजयी घोडदौड; क्वार्टर फायनलमध्ये धडक

सिंधूची विजयी घोडदौड; क्वार्टर फायनलमध्ये धडक

आता उपांत्यपूर्व फेरीचे आव्हान

Google News Follow

भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन करत चीनच्या जागतिक क्रमवारीतील पाचव्या मानांकित हान यू हिचा सरळ गेममध्ये पराभव केला. या शानदार विजयासह सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत दिमाखात प्रवेश केला.

सुमारे ३५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि संयमी खेळ करत २१-१६, २१-१४ अशा सरळ गेममध्ये विजय मिळवला. या विजयामुळे हान यूविरुद्ध सिंधूचा हेड-टू-हेड विक्रम ८-१ असा अधिक भक्कम झाला आहे. यंदाच्या हंगामातील सिंधूच्या सर्वोत्तम कामगिरींपैकी ही एक मानली जात आहे.

पहिल्या गेममध्ये पुनरागमन, दुसऱ्यात एकहाती वर्चस्व

सामन्याच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. हान यूने सुरुवातीला खेळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंधूने अचूक स्मॅश, नेटप्ले आणि बेसलाइनवरून केलेल्या आक्रमक फटक्यांच्या जोरावर सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. सलग गुणांची कमाई करत तिने पहिला गेम २१-१६ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये तर सिंधूने सुरुवातीलाच धडाकेबाज खेळ करत सलग आठ गुण मिळवून ८-० अशी मोठी आघाडी घेतली. हान यूने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र सिंधूने कोणतीही संधी न देता अचूक कोर्ट कव्हरेज आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाच्या जोरावर २१-१४ असा गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला.

आता ओकुहाराचे आव्हान

सध्या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत आता जपानची माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिच्याशी लढत होणार आहे. दक्षिण कोरियाची अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीतील क्रमांक एक खेळाडू आन से-यंग दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने ओकुहाराला दुसऱ्या फेरीत वॉकओव्हर मिळाला.

स्पर्धेत भारताची एकमेव आशा

मिक्स्ड डबल्समध्ये भारताची जोडी ध्रुव कपिला आणि तनीषा क्रास्टो यांना चीनच्या अव्वल मानांकित फेंग यान झे आणि हुआंग डोंग पिंग यांच्याकडून २०-२२, १७-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सिंधू ही आता जपान ओपनमध्ये भारताची एकमेव उर्वरित दावेदार ठरली आहे.

याआधी लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांचेही स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. सिंधूकडून आता उपांत्यपूर्व फेरीतही अशीच दमदार कामगिरी होण्याची भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा