इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, युवा फलंदाज शुभमन गिलला संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे, तर दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह, करुण नायरनेही भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.
शनिवारी निवड समितीने इंग्लंड दौर्यासाठी १८ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला. गिलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली असून, रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही संधी मिळाली आहे.
गिलने आतापर्यंत भारतासाठी ३२ कसोटी सामने खेळले असून, १८९३ धावा केल्या आहेत. त्याचा घरगुती सरासरी ४२.०३ तर परदेशात २७.५३ अशी आहे. इंग्लंड दौरा त्याच्यासाठी कर्णधार म्हणून पहिलाच संपूर्ण दौरा असेल.
संघात करुण नायर, साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन यांचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अर्शदीप सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे.
स्पिन विभागात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची जोडी असणार आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूर आणि नीतीश कुमार रेड्डी यांची निवड झाली आहे.
दरम्यान, सरफराज खानला संधी मिळालेली नाही आणि अनुभवी मोहम्मद शमी फिटनेसअभावी संघाबाहेर राहिला आहे.
मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी सांगितले की, “इंग्लंड दौरा कठीण असणार आहे, पण गिलमध्ये नेतृत्वगुण असून त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.”
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार असून, या मालिकेपासून भारताची २०२५-२७ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील वाटचाल सुरू होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ:
-
शुभमन गिल (कर्णधार)
-
ऋषभ पंत (उपकर्णधार व यष्टिरक्षक)
-
के. एल. राहुल
-
यशस्वी जायसवाल
-
बी. साई सुदर्शन
-
अभिमन्यू ईश्वरन
-
करुण नायर
-
नीतीश कुमार रेड्डी
-
रवींद्र जडेजा
-
ध्रुव जुरेल
-
वॉशिंगटन सुंदर
-
शार्दुल ठाकुर
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद सिराज
-
प्रसिद्ध कृष्णा
-
आकाश दीप
-
अर्शदीप सिंह
-
कुलदीप यादव
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका कार्यक्रम:
-
पहिली कसोटी – २० जून, हेडिंग्ले
-
दुसरी कसोटी – २ जुलै, एजबस्टन
-
तिसरी कसोटी – १० जुलै, लॉर्ड्स
-
चौथी कसोटी – २३ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड
-
पाचवी कसोटी – ३१ जुलै, द ओव्हल
