31 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरस्पोर्ट्समितालीला मागे टाकत स्मृतीचा नवा विक्रम!

मितालीला मागे टाकत स्मृतीचा नवा विक्रम!

Google News Follow

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने महिला आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध धडाकेबाज शतक ठोकत नवा इतिहास रचला. मानधनाने अवघ्या ६४ चेंडूंत १२४ धावांची वादळी खेळी केली. तिच्या या खेळीत १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तिच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा १३७ धावांनी पराभव केला.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील मानधनाचे हे दुसरे शतक, तर एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले. या विक्रमी खेळीसह मानधना आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे.

मानधनाने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात माजी भारतीय कर्णधार मिताली राजचा १०,८६८ धावांचा विक्रम मागे टाकला. तिन्ही फॉरमॅट मिळून मानधनाच्या नावावर आता १०,८८० आंतरराष्ट्रीय धावा आहेत.

आपल्या विक्रमांपेक्षा महिला क्रिकेटला मिळणारी प्रेरणा अधिक महत्त्वाची असल्याचे मानधनाने सांगितले. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “जर माझ्यामुळे दहा टक्के मुलींनीही बॅट आणि बॉल हातात घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तर त्याचा मला कायम अभिमान आणि आनंद वाटेल.”

आपल्या कारकिर्दीतील विक्रमांकडे कसे पाहते, याबद्दलही मानधनाने स्पष्ट मत व्यक्त केले. “मी नेहमी हेच मानत आले की माझे काम भारतासाठी सामने जिंकणे आहे. विक्रम, आकडे किंवा मी किती धावा केल्या यापेक्षा भारताने किती सामने जिंकले, याचा मी विचार करते,” असे तिने सांगितले.

मिताली राजकडे आदर्श म्हणून पाहत मोठी झालेल्या मानधनाने १० हजार धावांचा टप्पा पार करण्याचे कधी स्वप्नही पाहिले नव्हते, अशी कबुली दिली. मात्र आता या यादीत आणखी भारतीय खेळाडू असावेत, अशी तिची इच्छा आहे.

“मितालीला पाहत मोठी झाले. ती प्रत्येकासाठी आदर्श होती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी १० हजार धावांपर्यंत पोहोचेन आणि त्यांच्याही पुढे जाईन. मला आशा आहे की १० हजार धावांच्या यादीत भारतीय संघातील आणखी ३-४ खेळाडू असतील. टॉप-५ मध्ये तीन किंवा चार भारतीय खेळाडू असणे खूप छान असेल. माझ्या कारकिर्दीचे मूल्यमापन मी याच आधारावर करू इच्छिते,” असे मानधनाने म्हटले.

आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करण्याची गरज असल्याचेही मानधनाने स्पष्ट केले. “फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून तुम्ही कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही पूर्ण झालात असे वाटले, तर क्रिकेट तुम्हाला लगेच दाखवून देईल की तुम्ही अजूनही पूर्ण झालेले नाही,” असे ती म्हणाली.

षटकार मारण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही मानधनाने सांगितले. “लाँग-ऑफ आणि लाँग-ऑनवरील क्षेत्ररक्षकांनाही पार करता यावे आणि तसे करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी मी माझ्या षटकार मारण्याच्या क्षमतेवर सातत्याने काम करत आहे,” असे तिने सांगितले.

हाँगकाँगविरुद्ध मानधनाच्या १२४ धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत १९३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा डाव अवघ्या ५६ धावांत आटोपला आणि भारताने तब्बल १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा