29.7 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरस्पोर्ट्सफुटबॉलच्या महासत्तांना छोट्या देशाचा मोठा धक्का!

फुटबॉलच्या महासत्तांना छोट्या देशाचा मोठा धक्का!

केप व्हर्डेची फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत ऐतिहासिक एंट्री

Google News Follow

Related

अवघी पाच लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला आफ्रिकेतील छोटासा द्वीपराष्ट्र केप व्हर्डे आज संपूर्ण फुटबॉल विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या या संघाने इतिहास रचत विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे, पुरुषांच्या विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरी गाठणारा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश बनण्याचा मान केप व्हर्डेने पटकावला आहे.

गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात केप व्हर्डेने सौदी अरेबियाला ०-० अशा गोलशून्य बरोबरीत रोखले. त्याचवेळी स्पेनने उरुग्वेचा १-० असा पराभव केल्यामुळे गट ‘एच’मध्ये स्पेन अव्वल, तर केप व्हर्डे दुसऱ्या स्थानावर राहिला. तीनही सामने अनिर्णित ठेवत एकही सामना न गमावता केप व्हर्डेने बाद फेरीचे तिकीट मिळवले, तर दोन बलाढ्य संघांपैकी उरुग्वे आणि सौदी अरेबियाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
हे ही वाचा:
आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राची सुवर्ण मोहिम पुन्हा सुरू!

मध्य प्रदेशात वनरक्षक पदाच्या भरतीला अवघा एक उमेदवार, फिटनेस चाचणीला घाबरले?

‘भारत टॅक्सी’ची दमदार एंट्री!

यूएस ओपनमध्ये रौनक चौहानची ऐतिहासिक झेप

स्पेनविरुद्ध गोलशून्य बरोबरी, उरुग्वेविरुद्ध २-२ अशी दमदार कामगिरी आणि अखेर सौदी अरेबियाविरुद्ध संयमी बचावाच्या जोरावर मिळवलेला महत्त्वाचा एक गुण, या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे केप व्हर्डेने जगभरातील फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली. अनुभवी गोलरक्षक व्होझिन्हा यांच्यासह संपूर्ण संघाने बचाव आणि शिस्तबद्ध खेळाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले.

आता बाद फेरीत केप व्हर्डेसमोर विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिनाचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र या ऐतिहासिक यशानंतर संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. प्रशिक्षक बुबिस्ता यांनी “काहीही अशक्य नाही” असे सांगत आपल्या खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले. मर्यादित संसाधने, कमी लोकसंख्या आणि मोठ्या फुटबॉल राष्ट्रांशी तुलना करता अत्यल्प अनुभव असूनही केप व्हर्डेने जिद्द, संघभावना आणि शिस्त यांच्या जोरावर विश्वचषकात इतिहास घडवत छोट्या देशांनाही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, हे जगाला दाखवून दिले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा