31 C
Mumbai
Sunday, May 24, 2026
घरस्पोर्ट्सट्रेविस हेडशी मैदानावर भिडला विराट कोहली!

ट्रेविस हेडशी मैदानावर भिडला विराट कोहली!

Google News Follow

Related

आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर तब्बल ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यातील मैदानावरील शाब्दिक युद्धाची. सामना संपल्यानंतरही विराटचा राग शांत झाला नाही आणि त्याने ट्रेविस हेडशी हात मिळवणं टाळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली सनरायझर्स हैदराबादच्या इतर खेळाडूंशी हस्तांदोलन करताना दिसतो. मात्र ट्रेविस हेडसमोर आल्यावर त्याने पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे हेडने स्वतःहून हात पुढे केला होता, पण विराटने त्यांच्याकडे पाहिलंही नाही. या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेकांनी कोहलीवर टीकाही केली आहे.

सामन्यादरम्यान दोघांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. ट्रेविस हेड बाद झाल्यानंतर विराटने अतिशय आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं, जे हेडला आवडलं नाही. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजीवेळी विराट वारंवार हेडकडे पाहत टोमणे मारताना दिसला. हेडनेही इशाऱ्यांमधून विराटला प्रत्युत्तर दिलं. एका व्हिडिओमध्ये विराट हेडला “माझ्यासमोर गोलंदाजी कर” अशा आव्हानात्मक अंदाजात बोलताना दिसला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्माने २२ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी केली. ईशान किशनने ४६ चेंडूत ७९ धावांचा स्फोटक मारा केला, तर हेनरिक क्लासेनने अवघ्या २४ चेंडूत ५१ धावा ठोकत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.

२५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला २० षटकांत ४ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. रजत पाटीदारने ५६ धावांची झुंजार खेळी केली, तर वेंकटेश अय्यरने १९ चेंडूत ४४ धावांचा फटकेबाज डाव साकारला. क्रुणाल पांड्या ४१ धावांवर नाबाद राहिला, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा