36 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरस्पोर्ट्सविंबल्डनमध्ये मोठा उलटफेर!

विंबल्डनमध्ये मोठा उलटफेर!

ओसाकाने अव्वल मानांकित सबालेन्काला हरवत प्रथमच गाठली उपांत्यपूर्व फेरी

Google News Follow

Related

जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका हिने विंबल्डन २०२६ स्पर्धेत मोठा उलटफेर घडवत जगातील अव्वल मानांकित आर्यना सबालेन्का हिचा सरळ दोन सेटमध्ये ६-२, ७-६ (७-२) असा पराभव केला. या विजयासह ओसाकाने आपल्या कारकिर्दीत प्रथमच विंबल्डनच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत धडक मारली.

सेंटर कोर्टवर झालेल्या या लढतीत चार वेळची ग्रँडस्लॅम विजेती ओसाका सुरुवातीपासूनच आक्रमक खेळली. अवघ्या १ तास २८ मिनिटांत तिने सामना जिंकत सबालेन्काविरुद्ध अनेक वर्षांनंतर विजयाची नोंद केली. २०२६ मध्ये या दोघींमध्ये झालेल्या तिन्ही सामन्यांत सबालेन्काने बाजी मारली होती. तसेच २०१८ यूएस ओपननंतर ओसाकाचा सबालेन्कावरील हा पहिलाच विजय ठरला.

पहिल्या सेटमध्ये ओसाकाने दमदार सर्व्हिस आणि अचूक फटकेबाजीच्या जोरावर सबालेन्काला कोणतीही संधी दिली नाही आणि ६-२ असा सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्काने जोरदार पुनरागमन करत सामना टायब्रेकपर्यंत नेला. मात्र, निर्णायक टायब्रेकमध्ये ओसाकाने ७-२ अशी सरशी करत सामना आपल्या नावावर केला.

आई झाल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या ओसाकासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. तिच्या शानदार पुनरागमनाचा हा मोठा टप्पा मानला जात असून, ती आता विंबल्डन विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानली जात आहे.

दुसरीकडे, या पराभवासह सबालेन्काची सलग १४ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची मालिका खंडित झाली. २०२२ यूएस ओपनपासून सुरू झालेली ही मालिका अखेर थांबली. तसेच २०२० यूएस ओपननंतर प्रथमच तिला ग्रँडस्लॅम स्पर्धेत सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा