26.9 C
Mumbai
Thursday, July 2, 2026
घरस्पोर्ट्सविंबल्डनमध्ये जोकोविचची दणदणीत आगेकूच; सित्सिपासवर सरळ सेटमध्ये मात

विंबल्डनमध्ये जोकोविचची दणदणीत आगेकूच; सित्सिपासवर सरळ सेटमध्ये मात

Google News Follow

Related

विंबल्डनचा सात वेळचा विजेता नोव्हाक जोकोविच याने आणखी एक दमदार विजय नोंदवत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा जोकोविचने अवघ्या ९८ मिनिटांत ६-३, ६-४, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पहिल्या फेरीत चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीत जोकोविच सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लयीत दिसला. आक्रमक खेळ, अचूक सर्व्हिस आणि प्रभावी रिटर्नच्या जोरावर त्याने पहिला सेट केवळ २७ मिनिटांत ६-३ असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये सित्सिपासने काही काळ चुरस निर्माण केली. मात्र निर्णायक क्षणी जोकोविचने आपल्या अनुभवाचा प्रत्यय देत महत्त्वाचा ब्रेक मिळवला आणि ६-४ अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने पूर्ण वर्चस्व गाजवले. ३-२ अशी आघाडी घेतल्यानंतर त्याने सित्सिपासची सर्व्हिस ब्रेक केली आणि त्यानंतर एकतर्फी खेळ करत ६-२ ने सेट आणि सामना आपल्या नावावर केला.

या सामन्यात जोकोविचने ३३ विनर्स लगावले, तर केवळ ७ अनफोर्स्ड एरर्स केल्या. या विजयासह त्याने विंबल्डनच्या तिसऱ्या फेरीत २०व्यांदा प्रवेश करण्याचा मान मिळवला.

जोकोविच आणि सित्सिपास यांच्यातील हा १४वा सामना होता. त्यापैकी १२वा विजय जोकोविचच्या नावावर जमा झाला असून, सित्सिपासविरुद्ध त्याने सलग ११ सामने जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विजयानंतर जोकोविच म्हणाला, “कोर्टवर अशा प्रकारचा खेळ करता आला की खूप आनंद आणि समाधान मिळते. एकदा लय मिळाली की आत्मविश्वासही वाढतो. ५-२ अशी आघाडी असताना खेळलेला रिटर्न गेम हा अलीकडच्या काळातील माझ्या सर्वोत्तम रिटर्न गेमपैकी एक होता. त्या वेळी मी पूर्णपणे रिलॅक्स होतो आणि कोणत्याही दबावाशिवाय माझे फटके खेळत होतो.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा