28.6 C
Mumbai
Friday, July 3, 2026
घरस्पोर्ट्सभारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गाथा

भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गाथा

'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित

Google News Follow

Related

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या संघर्ष, जिद्द, मेहनत आणि देशासाठीच्या समर्पणाची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. टीझरमध्ये मातीशी असलेली नाळ, कुस्तीच्या आखाड्यातील घाम, अपार मेहनत आणि यशासाठीची अथक धडपड प्रभावी सिनेमॅटिक शैलीत साकारण्यात आली आहे. दमदार पार्श्वसंगीत, भव्य दृश्यरचना आणि प्रत्येक फ्रेममधून दिसणारी ऐतिहासिक भव्यता यामुळे हा चित्रपट केवळ क्रीडापट नसून भारतीय क्रीडा इतिहासाला वाहिलेली भावपूर्ण आदरांजली ठरणार असल्याची झलक टीझरमधून मिळते.
हे ही वाचा:
शेअर बाजारात जोरदार तेजी!

खंडणी प्रकरणात तृणमूल नेते इफ्तिखार अहमद अटकेत

ऑस्ट्रेलियात पुन्हा मोदींची क्रेझ!

भारत-जपानमध्ये संयुक्त संरक्षण सह-विकास प्रकल्प करार

या टीझरमधील आणखी एक विशेष बाब म्हणजे मुख्य भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा अद्यापही गुप्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खाशाबा जाधव यांची भूमिका नेमका कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, नागराज मंजुळे स्वतः एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत असून, त्यांच्या प्रभावी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून, निर्मितीची धुरा ज्योती देशपांडे आणि नागराज मंजुळे यांनी सांभाळली आहे.

भारताच्या क्रीडा इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाला मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा ‘खाशाबा’ हा भव्य चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी स्पोर्ट्स बायोपिक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात असून, प्रेक्षकांना आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा