28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरUncategorizedमहाराष्ट्राच्या मातीत दरवळणार काश्मिरी केसराचा सुगंध

महाराष्ट्राच्या मातीत दरवळणार काश्मिरी केसराचा सुगंध

Google News Follow

Related

स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर हिमालयीन केसराची लागवड केली आहे. या वर्षीपासून महाबळेश्वरमधल्या केसराला मोहर येऊ लागला आहे. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी जम्मू आणि काश्मिरच्या किश्तवार भागातून केसराचे फूल आणून शेतकऱ्यांना लागवडीस सहाय्य केले.

महाबळेश्वर हे समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट फूट उंचीवर स्थित असलेले प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची, कमी तापमान आणि जमीनीची प्रत केसरासाठी अनुकूल आहे. केसर हे भारतातील सर्वात महाग मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे. याची आंतर्देशीय बाजारातील किंमत तीन-साडे तीन लाख रुपये प्रतिकिलो आहे. एका केसर उत्पादक शेतकऱ्याने बिझनेस लाईनला सांगितल्यानुसार स्ट्रॉबेरीमधून प्रतिएकर केवळ साडेतीन लाख रुपये मिळत असल्याने त्याने प्रायोगिक तत्त्वावर केसराची शेती करायचे ठरवले. सर्व केसर उत्पादक शेतकरी सध्या जानेवारीत पूर्ण बहर येण्याच्या प्रतिक्षेत असून, त्यापूर्वीच तापमानात फार वाढ होऊ नये, अशी आशा करत आहेत.

स्थानिक कृषी अधिकारी गणेश बोरडे यांनी सांगितले की, केसराचे उत्पादन अतिशय कठिण असते, कारण दिड लाख फुलांपासून एक किलो केसर जमा होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा