कबुतर खान्याच्या मुद्द्यावरून बुधवारी मुंबईत राडा झाला. कबुतर खान्यावर लावण्यात आलेली ताडपत्री फाडण्यात आली आणि कबुतरांना खाद्य मिळालेच पाहिजे यासाठी दुराग्रह केला गेला. कबुतरांमुळे श्वसनाचे विविध विकार होतात हे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे त्या अंगाने या प्रश्नाचा विचार होणार की, केवळ भावनिक मुद्यावर विचार केला जाणार?



