उद्योगपती एलॉन मस्क याने काढलेली ‘अमेरिका पार्टी’ हा प्रयोग अमेरिकेत उलथापालथ निर्माण करणारा आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत सुडबुद्धीचे आणि खूनशी आहेत. त्यांनी एलॉनला अमेरिकेच्या बाहेर हाकलण्याचे सुतोवाच केलेले आहे. हे घडू शकते याची जाणीव असल्यामुळे एलॉनही तयारीत आहे. दोन माजलेल्या हत्तींची ही साठमारी अमेरिकाच नाही, सगळ्या जगातील समीकरणे उटलीपालटी करणार अशी चिन्हे आहेत. ट्रम्प यांच्या हाती अमर्याद ताकद आहे. परंतु एलॉन यांच्या हातात ट्रम्प यांच्या आणि अमेरिकी सरकारच्या नाड्या आहेत. ट्रम्प यांनी खणून काढण्यासाठी मस्क यांनी काढलेला एक अत्यंत खळबळजनक मुद्दा म्हणजे एपस्टीन फाईल. लहान मुलींच्या लैगिक शोषणात गुंतलेला एपस्टीन तुरुंगात मरण पावला आहे. तरीही हा मुद्दा संपलेला नाही. कारण ती जिवंत आहे. एक्स अकाऊंटवर मस्क यांनी पुन्हा एकदा एपस्टीन फाईल्स संदर्भात एक पोस्ट केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव जेफ्री एपस्टीनच्या गुप्त फाईल्समध्ये आहे, आणि त्यामुळेच त्या फाईल्स अजून उघड झालेल्या नाहीत. या दाव्यावर मस्क ठाम आहेत. एलॉन मस्कने जून महिन्यात एक ट्वीट करून युद्ध गर्जना केली होती.



