काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना राजकारणात करण्यासारखे फार काही उरलेले नसल्यामुळे सध्या त्या लेखिकाच्या भूमिकेत शिरलेल्या आहेत. अंदमान-निकोबार द्वीप समुहावर होणाऱ्या प्रस्तावित ग्रेट निकोबार प्रकल्पावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. पर्यावरण आणि आदीवासींचा मुद्दा पुढे करून त्या हा विरोध करीत आहेत. एकूणच सोनियांचे राजकारण पाहीले तर देशाचे संरक्षण आणि सुरक्षेला मजबूत करणाऱ्या प्रत्येक महाप्रकल्पाला त्यांनी विरोध केलेला दिसतो. विशेष करून ते प्रकल्प जे चीनच्या कारवायांना चाप बसवण्यासाठी किंवा त्यावर नजर ठेवण्यासाठी राबविण्यात येणार होते. मूलनिवासी आदीवासींचे अस्तित्व आणि पर्यावरण साखळीला धोका असे मुद्दे सोनिया गांधी यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात लिहीलेल्या या लेखात उपस्थित केले आहेत. सोनियाबाई यांच्या नेतृत्वाखालील जो काँग्रेस पक्ष भारतातील मूलनिवासी हिंदू आणि त्यांची संस्कृती उखडून टाकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय, त्याला शोपेन आणि निकोबारी या आदीवासांची कळवळा का आला आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेला अंदमानच्या संवेदनशील पर्यावरण साखळीचा जो मुद्दा उपस्थित केला आहे. ती एक ढाल आहे. पर्यावरण हा संवेदनशील विषय आहे. काही विशिष्ट भूगोलात तो जास्त संवेदनशील होतो. भारत-चीनच्या सीमेवर हिमालय उभा आहे. हिमालयाचे लडाखपासून अरुणाचलपर्यंतचे सगळेच क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. १९८२ मध्ये नॅशनल जिओग्राफीने फ्रॅजिल माऊंटन या शीर्षकाखाली हिमालयावर एक डॉक्युमेंटरीच बनवली होती. उत्तराखंडात दर पावसाळ्यात आलेल्या पूरात तिथल्या टेकड्या वाहून जाताना दिसतात. कडेच्या कडे खाली सरकतात. परंतु तरीही या भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करणे ही भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. कारण चीन ते बनवतो आहे



