पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या भूमीची निवड केली आहे. पाकिस्तान हा मातीने भरलेला जुना ट्रक आणि भारत हा मर्सिडीज अशी तुलना त्यांनी केली आहे. कितीही चकचकीत असली तरी ट्रकसमोर मर्सिडीज टीकत नाही, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ही तुलनाच मुळात चुकलेली आहे. पाकिस्तानचे नेते अजून जमीनीवरच असल्यामुळे असेल भारताची स्टारशिप अंतरीक्षात पोहोचली हे त्यांच्या लक्षातच येत नाही. पाकिस्तानच्या जुन्या ट्रकला लेसर बीमच्या सहाय्याने क्षणात उद्ध्वस्त करण्याची भारताची ताकद आहे. त्यांनी आतापर्यंत फक्त ब्रह्मोसची चव चाखली आहे. ते तर फक्त ट्रेलर होते.



