22 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानफडणवीस नटवरलाल रोहित पवार लोकनेते |

फडणवीस नटवरलाल रोहित पवार लोकनेते |

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे असलेली देवाभाऊ ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अनेकांमध्ये प्रचंड कुतुहल आहे. ही जाहिरात कुणी अज्ञात व्यक्तीने दिली, त्यावर किती पैसे खर्च करण्यात आले असे सवाल विचारताना त्या जाहिराती वर्तमानपत्रांत कुणी दिल्या याची माहिती काढून घेणे सहज शक्य आहे, पण ती काही विरोधकांना मिळालेली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने देवा, तूच सांग अशी आर्त हाक देत एक जाहिरात दिली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न, लाडक्या बहिणीचा मुद्दा, शेतकऱ्यांची कर्जमाफी असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्यावर लिहिलेला देवा हा शब्द पांडुरंगासाठी लिहिलेला आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांचा आहे. रोहित पवार तर त्यापुढे जाऊन म्हणाले की, अशा प्रकारचे कोट्यवधींचा खर्च करून जाहिराती देण्याने कुणी नटवरलाल लोकनेता होत नाही. रोहित पवार हे फडणवीसांना लोकनेता मानत नाहीत ते कदाचित फक्त आणि फक्त शरद पवारांनाच लोकनेता मानत असतील तर ते चूक नाही. पण रोहित पवारांनी नाही म्हटलं म्हणून फडणवीस लोकनेते नाहीत असं म्हणण्याची गरज नाही. कारण गेल्या काही निवडणुकातील कामगिरी आणि त्यातली आकडेवारीच सगळं काही बोलून जाते. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार निवडून आणले, २०१९ला १०५ आमदार निवडून आले तर २०२४ ला १३२ आमदार निवडून आणत पराक्रम केला. आता लोकनेता असण्याची यापेक्षा आणखी कोणती पोचपावती द्यायला हवी. लोक जर विक्रमी मतसंख्येने एखाद्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार, खासदार निवडून देत असतील तर त्यालाच लोकनेता म्हणावे लागेल. शरद पवार हे दिग्गज नेते आहेत पण त्यांना इतक्या वर्षात कधी १०० आमदारांचा आक़डा गाठता आला नाही. ती संख्या नेहमीच ५५-५६ पर्यंतच मर्यादित राहिली. फडणवीसांनी हे केवळ जाहिराती देऊन तर प्राप्त केले नसेल. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोहित पवार जेव्हा फडणवीसांच्या लोकनेता असण्यावर शंका घेतात, तेव्हा त्यांनाही आपल्यामध्ये लोकनेता बनण्याची पुरेपूर क्षमता आहे, हे पटवून द्यावे लागेल. रोहित पवार हे आपल्या ताकदीवर निदान आपल्या आजोबांएवढे ५५-५६ आमदार जेव्हा निवडून आणतील तेव्हा ते लोकनेता कुणाला म्हणावं हा प्रश्न विचारण्यास पात्र असतील. नाहीतर केवळ आरोप करायचे, रोज टोमणे मारायचे, प्रसिद्धीमाध्यमासमोर ज्ञान द्यायचे यातून कुणी लोकनेता होत नाही, हे राजकारणात वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. अशी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा