अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज भारताला धमक्या देत आहेत. रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणत आहेत. भारतावर लादलेले २५ टक्के टेरीफ आणखी वाढू शकेल अशी विधाने करयातय. ते भारताला चटके देण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु आग मात्र अमेरिकेत लागली आहे. गुंतवणूक क्षेत्रातील भीष्माचार्य वॉरेन बफेट यांच्यापासून अनेक जण कळवळतायत. अमेरिकेच्या अर्थकारणातील ११ व्या क्रमांकावर असलेले बफेट यांची महाकाय कंपनी बर्कशायर हैथवेला ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा झटका बसल्याचे काल जाहीर झालेल्या अहवालातून उघड झाले आहे. भारत फक्त रशियाकडून तेलखरेदी करीत नाही, हे तेल जगभरात निर्यात करून पैसे कमवतो. यूक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची भारताला पर्वा नाही. म्हणून मी भारतावर टेरीफ वाढवत नेणार अशी एक ताजी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर टाकली आहे. ट्रम्प त्यांच्या ट्रुथ सोशल वरून रोज अशी बकवास करतात. भारताच्या विरोधात गरळ ओकतात. जुने वैमनस्य असल्यासारखी त्यांची वागणूक आहे. परंतु ट्रम्प यांची ही वागणूक फक्त भारतासोबत नाही. त्यांनी स्विस घडाळ्यांवर ३९ टक्के टेरीफ आकारले आहे. डोक्यावर बंदूक ठेवून ते जगातील तमाम नेत्यांना शरण आणू इच्छितात. ट्रम्प यांच्यासोबत ट्रेड डील झालेले देश किंवा ईयूसारखा गट समाधानी नाही. ट्रम्प यांच्या धमकीमुळे युरोपियन युनियनने व्यापार केला.



