वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची नैतीक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात दहा वर्षे मंत्री पदी असताना पवार असे काय करत होते, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उसंत मिळाली नाही, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे



