अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी नेत्यांचे कौतूक करतायत. अमेरिकेच्या आर्मी डे परेडमध्ये भारताकडून पिटाई झालेल्या पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेले आहे. अमेरीकेच्या सेंटर कमांडचे कमांडर मायकल कुरीला पाकिस्तानची भलामण करताय. एफबीआयचे डायरेक्टर काश पटेल वगळता अवघी अमेरीकाच पाकिस्तानला घोड्यावर बसवण्यासाठी इतकी उतावीळ झाली आहे. चीनचा पदर सोडून पाकिस्तान अमेरीकेकडे कलंडला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. इराणचा काटा काढायला अमेरिकेला पाकिस्तानची भूमी हवी आहे. पाकिस्तानवरील अमेरिकी प्रेमाचा रंग अधिक गडद झालेला आहे



