मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही दिवस आपण ऐकतोय महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनापासून की राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन काळामध्ये सभागृहात बसले असताना मोबाईलवर पत्ते खेळत होते, रमी खेळत होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्वीट केला, म्हणजे नुसता पोकळा आरोप केला असा नाही तर त्याचा व्हिडिओ, फोटो हे सगळे आता समाज माध्यमांवर आहेत.



