तुमच्याकडे सोने आहे, तरीही तुम्हाला ते वापरता येत नाही. तुमच्या वेळा काळाला बाहेरून विकत घ्यावे लागते. हीच गेली अनेक दशके भारताची अवस्था आहे. देशात कित्येक ट्रिलियन डॉलरचे तेल भंडार आहे. परंतु पर्यावरणाच्या नावाखाली, समुद्रातील जैवविविधतेच्या नावाखाली याला हात लावण्याची चोरी होती. गेल्या दहा वर्षात या ब्लॅकमेलिंगला बळी न पडता संवेदनशील क्षेत्रातील तेलसाठे शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. त्यासाठी ढीगभर पैसे खर्च करण्यात आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील अशा अलास्का सारख्या प्रांतात तेल-गॅस शोधायला सुरूवात केली. त्यामुळे जग आता भारताला रोखू शकत नाही. डंके की चोट पर, आपण अंदमान सुमद्रातली तेल काढण्याची घोषणा केली आहे. हे आकडे जगाचे डोळे पांढरे करणारे आहेत. भारतीयांचे आयुष्य बदलण्याची हमी देणारे आहेत.



