अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या कोणीच मनावर घेत नाही, असे दिसते आहे. वॉशिग्टनमध्ये झालेल्या एआय समिटमध्ये बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकी टेक कंपन्यांनान झापले होते. अमेरिकी कंपन्या चीनमध्ये कारखाने उभारतात, भारतीयांना नोकऱ्या देतात. हे माझ्या कार्यकाळात चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. ट्रम्प यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत, गूगलचा आंध्र प्रदेशात डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. अमेरिकी टेक कंपन्यांना ट्रम्प यांनी कितीही दटावले असले तरी भारताशी पंगा घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कारण या कंपन्या भारता बक्कळ कमाई करतात. १४० कोटींचा हा देश हातून गमावणे हा त्यांच्या दृष्टीने मुर्खपणा आहे. ट्रम्प यांना फक्त चार वर्षे काढायची असल्यामुळे ते वाट्टेल ते बोलू शकतात, करू शकतात, परंतु गुगलसारख्या कंपन्या त्यांच्या सांगण्यावरून पायावर कुऱ्हाड मारून घेतील अशी शक्यता कमी आहे.



