निवडून येण्याची क्षमता संपली की मग देशातील वेगवेगळ्या व्यवस्थांवर, त्यातल्या व्यक्तींवर संशय घेणे हा काही लोकांचा एक आवडता छंद बनला आहे. त्यानुसार राहुल गांधींना फटकारणारे दीपांकर दत्ता खलनायकाच्या पंक्तीत बसले तर भाजपाच्या माजी प्रवक्त्या असलेल्या आरती साठेंनाही त्यातूनच जावे लागले.



