संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू आहे. पाकिस्तानची भारतीय सेनेने कशी सालटी काढली, पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे उत्तर कसे दिले, भारतीय लष्कराने कशी कमाल केली, याबाबत सत्ताधारी पक्ष पुराव्यासह बोलतो आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची, त्यांच्या तैनातीत असलेल्या चिल्लर पक्षांच्या नेत्यांची संसदेतील भाषणे ऐकली की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पाकिस्तान नावाच्या टुकार भिकार देशाचे एक कर्तृत्व लक्षात येते. हे कर्तृत्त्व लहान सहान नाही. प्रचंड मोठे आहे. सर्वसामान्य भारतीयांनीही ते जाणून घेण्याची गरज आहे. एखाद्या गंभीर विषयावर चर्चेची, विशेष अधिवेशनाची मागणी करायची आणि प्रत्यक्षात ही चर्चा करण्याची संधी येते तेव्हा गोंधळ घालायचा. चर्चा होणारच नाही किंवा जमेल तितके अडथळे येतील हे पाहायचे, ही काँग्रेसची रणनीती गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळालेली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी घेतलेली बोटचेपी, नपुंसक भूमिका आणि केलेली कर्म सगळ्याचा जनतेला विसर पडलाय अशा समजात हे लोक बोलत असतात, त्यामुळे नेहमी उघडे पडत असतात. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी काल दिलेल्या मुलाखतीत केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.



