28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषअतिशी मार्लेना यांना भाजपकडून नोटीस

अतिशी मार्लेना यांना भाजपकडून नोटीस

Google News Follow

Related

आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आणि मंत्री आतीशी मार्लेना यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने मानहानीचा दावा दाखल करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आतीशी यांनी मंगळवारी यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्क केला होता. याशिवाय त्यांना एका महिन्यात अंमलबजावणी संचालनालयच्या माध्यमातून अटक करण्यात येईल असे विधान त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर अतिशी यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

अतिशी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज, आमदार दुर्गेश पाठक, राज्यसभा खासदार राघव चद्धा यांना लवकरच अटक होणार आहे. याशिवाय इडी कडून आपण आणि आपले नातेवाईक यांच्या घरी छापेमारी करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला अटक करण्यात येणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची कोणतीही आवश्यकता नाही कारण त्यांच्या विरोधात दिल्ली दारू प्रकरणात कोतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दिल्ली विधानसभेत पूर्ण बहुमत आहे.

हेही वाचा..

‘संजय सिंह यांना जामीन दिल्याने तपासावर विपरित परिणाम नाही’

फारुख अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सविरोधात गुलाम नबींनी थोपटले दंड

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

अतिशी म्हणाल्या होत्या की, अरविंद केजरीवाल यांनी जर राजीनामा दिला तर मुख्यमंत्र्यांना अटक करून सरकार पाडण्याची भाजपची जी पद्धत आहे ती एका सरळ प्रक्रिया बनेल. दरम्यान भारतीय जनता पक्षाने आपच्या या दाव्यावर पलटवार केला आहे. भाजपचे दिल्लीचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा म्हणाले, अतिशी यांची विधाने ही खोटी आहेत. पूर्ण आम आदमी पार्टी ही दारू घोटाळ्यामध्ये सहभागी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा