एसटी बँकेत गोलमाल! भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने करोडो लाटले?

श्रीरंग बरगे यांची पत्रकार परिषदेत मागणी!

एसटी बँकेत गोलमाल! भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने करोडो लाटले?

स्टेट ट्रान्पोर्ट को-ऑप. बँक या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत नव्याने भरती करण्यात आलेले ११७ तात्पुरते कर्मचारी, बँकेत तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आलेले ३० सेवानिवृत्त कर्मचारी व २६७ कायम कर्मचारी यांना देण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता व बोनसची रक्कम त्यांच्याकडून परत घेण्यात आली असून नवीन कर्मचारी भरतीत सुद्धा करोडो रुपयांचा घोटाळा झालेला आहे. वसूल करण्यात आलेली रक्कम कुणाच्या घशात गेली. या सर्व संशयित व्यवहारांची पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

https://youtu.be/FNIGTYB6iZA

आज दादर येथे झालेल्या महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बरगे यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला शिवनाथ डोंगरे, आर्थिक फसवणूकीला बळी ठरलेले बँकेतील माजी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

एसटी बँकेत करण्यात आलेली बेकायदेशीर कर्मचारी भरती, संचालकांकडून होणारी उधळपट्टी व इतर सर्व कामकाजाबाबत सहकार आयुक्त व रिझर्व्ह बँकेकडे अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशी होऊन तसा अहवाल बँकेच्या पदसिद्ध अध्यक्षांकडे कारवाईसाठी दिला गेला, पण त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही, ना कोणतीही कारवाई केली गेली. परिणामी बँक आर्थिक अडचणींत सापडली असून सभासदांना या वर्षीचा लाभांश मिळालेला नाही. कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आता दररोज नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. बँकेच्या पंढरपूर शाखेतील निलंबित बँक कर्मचाऱ्याचा विभागीय चौकशी अहवाल वरिष्ठांकडे तातडीने पाठविण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्विकारताना बँकेच्या कोल्हापूर शाखेचा निरीक्षक राहुल पुजारी हा रंगेहाथ सापडला गेला. पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. पोलिसांनी हा तपास पुढे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करून बँकेत करण्यात आलेली बेकायदेशीर भरती, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, बढत्या, कर्मचाऱ्याना देण्यात आलेला बोनस, प्रोत्साहन भत्ता या बाबतीत झालेल्या गैर व्यवहाराचा तपास पुढे सुरू ठेवल्यास त्यांना सर्व पुरावे देण्यास तयार असून साधारण २ कोटी २० लाख रुपयांचे संशयित व्यवहार झाले असल्याचे आमचे मत आहे. कांहीं खाते क्रमांक व त्यात झालेल्या संशयित व्यवहाराचे पुरावे देण्यास आम्ही तयार असून पोलिसांनी पुढे तपास केला तर तर बँकेत झालेल्या या गैर व्यवहाराच्या मागे कोण आहे हे सुद्धा सिद्ध होईल, असेही या पत्रकार परिषदेत बरगे यांनी सांगितले.

हेही वाचा :

इम्रान खान सपत्निक जाणार तुरुंगात, भ्रष्टाचार प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा!

इस्कॉनचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी महाकुंभ मेळ्यासाठी दाखल

सैफच्या पाठीच्या कण्याजवळ अडकला होता चाकूचा तुकडा

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा पास्टर अटकेत!

१) बँकेत साधारण ११७ कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात आले असून सहकार आयुक्त कार्यालयाने पत्र पाठवून सुद्धा त्यांना कामावरून कमी करण्यात आलेले नाही. संपूर्ण भरती नियम डावलून करण्यात आली आहे.

२) बँकेतील ३० निवृत्त कर्मचारी व अधिकारी करार पद्धतीने भरती करण्यात आले असून त्यांना सुद्धा कायम कामासाठी घेता येत नाही,असा सहकार आयुक्त कार्यालयाचा नियम आहे.

३) प्रोत्साहन भत्ता प्रत्येकी ७५००० रुपये व बोनस प्रत्येकी ५० हजार रुपये इतका ११७ कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या देण्यात आला असून त्यातील प्रोत्साहन भत्त्याचे ७५००० हजार रुपये हे परत घेण्यात आले आहेत. त्याचे बहुतांशी व्यवहार हे बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे त्यांना ५० हजार रुपये इतका बोनस देण्यात आला असून त्यातील ४०,००० रुपये इतकी रक्कम परत घेण्यात आली आहे. त्यातील काही व्यवहार हे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर करण्यात आले आहेत. त्याचाही पुरावा आहे.

४) शिवनाथ जगदीश डोंगरे, यांना लिपिक पदावर कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले होते. त्यांना ६० ते ७० हजार रुपये पगार मिळेल असे सांगितले. पण २०, ००० रुपये पगार मिळत असल्याने त्यानी लाच म्हणून दिलेली रक्कम परत मागितल्याने त्यांचा नोकरीचा जबरदस्ती राजीनामा घेऊन कमी करण्यात आले. त्यांनी लाच म्हणून दिलेले एकूण ११ लाखापैकी फक्त ६ लाख परत करण्यात आले. ५ लाख अजून शिल्लक आहेत. त्यातील २ लाख ५ हजार रुपये इतक्या रक्कमेचा धनादेश देण्यात आलेला आहे. पण तो परत आला. व पैसे मिळाले नाहीत. याचे पुरावे आहेत.

५) प्रोत्साहन भत्ता म्हणून एकूण ८७ लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आली असून त्यातील बहुतांशी रक्कम परत घेण्यात आली आहे.व ज्यांनी सदर रक्कम परत देण्यास नकार दिला त्या बँकेत कायम नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

६) पत्रकार परिषदेला पीडित लिपिक डोंगरे यांची ८० वर्षाची आई… श्रीमती करुणा डोंगरे या सुद्धा अचानक आल्या होत्या.

Exit mobile version