26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरक्राईमनामासैफच्या पाठीच्या कण्याजवळ अडकला होता चाकूचा तुकडा

सैफच्या पाठीच्या कण्याजवळ अडकला होता चाकूचा तुकडा

डॉ. नितीन डांगे यांनी सांगितला प्रसंग

Google News Follow

Related

अभिनेता सैफ अली खान याच्या पाठीवर गंभीर स्वरूपाची जखम झाली होती. जवळपास अडीच इंच इतका चाकुचा तुकडा मणक्याजवळ अडकला होता, पण कोणतेही गंभीर नुकसान झाले नव्हते, अशा शब्दात लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी सैफ अली खानवर उपचार केल्यानंतर आपल्या भावना एबीपी माझाकडे व्यक्त केल्या.

डॉ. डांगे यांनी सैफला रात्री ३.३० ला दाखल केल्यावर घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, त्या चाकूच्या तुकड्यामुळे मज्जातंतूला इजा झाली होती आणि स्पायनल फ्लूईड (पाठीच्या कण्यातील द्रव) वाहत होता. मग तो चाकूचा भाग काढला आणि ते पाणी थांबवले. नंतर प्लॅस्टिक सर्जनने पाठीवर आणि मानेवर ज्या जखमा होत्या तिथे टाके घातले. त्यांनतर सैफला आम्ही आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता त्यांना कोणतीही समस्या नाही. कोणताही धोका नाही. उद्या शुक्रवारी त्यांना रूममध्ये हलवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

घरात घुसून हल्ला करणाऱ्याने सैफअली कडे केली एक कोटीची मागणी

मुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत…

सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…

महाकुंभ: आतापर्यंत ६.२५ कोटी भाविकांनी संगमात केले स्नान!

डॉ. डांगे म्हणाले की, जेव्हा सैफला रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या पाठीच्या मणक्याला खूप दुखत होते. म्हणून मग आल्या आल्या सीटी स्कॅन केले. तेव्हा दिसले की एक चाकूचा तुकडा कण्याच्या बाजूला अडकला आहे. तो खोलवर अडकल्यामुळे खूप वेदना होत होत्या. मग त्यांना ऑपरेशनसाठी हलवण्यात आले. ६ वाजता त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली ती १०.३०वाजेपर्यंत चालली. प्रथम आम्ही पाठीचे ऑपरेशन केले. ऑपरेशन झाल्यावर ते शुद्धीत होते. किंबहुना जेव्हा त्यांना आणले तेव्हाही ते चांगले शुद्धीत होते.

सैफ जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा थोडा घाबरलेला होता पण लवकरच तो स्थिरस्थावर झाला. पण शस्त्रक्रिया झाल्यावर ते समाधानी दिसत होते. आता ते पूर्णपणे सुस्थितीत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा