केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेली तिखट जाळ टीका राष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांना प्रचंड बोचलेली दिसते. गृहमंत्री शहा हे काय नोंद घेण्यासारखी व्यक्ति नाही, असे सांगत पवारांना त्यांच्यावर अख्खी पत्रकार परीषद खर्च केली. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात निष्ठेची कसोटी पाहाणारे क्षण येतात. जेव्हा पवारांच्या आय़ुष्यात हा क्षण आला तेव्हा ते खुर्चीच्या मोहात पडले. अमित शहा यांनी मात्र निष्ठेसाठी तुरुंगवास भोगला. अमित शहा यांना सुद्धा मोदींचा वसंतदादा करता आला असता. परंतु त्यांनी गद्दारी केली नाही.