गुजरातमधील भरुच येथील सेंट झेवियर्स शाळेच्या उपप्राचार्याने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पास्टर कमलेश याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनी सध्या महाविद्यालयात शिकत असून जेव्हा ही घटना घडली तेव्हा ही विद्यार्थिनी घटना घडली तेव्हा ती सेंट झेवियर्समध्ये शिकत होती. शाळा सुटल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विविध ठिकाणी लैंगिक शोषण झाल्याचा उल्लेख आहे.
तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीवर २०२२ आणि २०२४ दरम्यान दोन वेगवेगळ्या प्रसंगी हा गुन्हा घडला होता. दोन्ही प्रसंगी, पास्टर कमलेशने पीडितेला, त्या वेळच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीला आपल्या कार्यालयात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब उघडकीस येताच शाळेने पास्टरवर कारवाई करण्याऐवजी त्याची दुसऱ्या शाळेत बदली केली. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर सुमारे चार दिवसांनी पोलिसांनी त्याला तेथून १५ जानेवारी रोजी अटक केली. दरम्यान, अन्य विद्यार्थ्यासोबत असेच गैरवर्तन झाले आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हे ही वाचा :
मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
भारतातील वाहन उद्योग १२ टक्क्यांनी वाढला
इस्कॉनचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी महाकुंभ मेळ्यासाठी दाखल
इमर्जन्सीविरोधात पंजाबमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने
विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, पास्टर कमलेशने तिला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर बळजबरी केली, जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर तो तिला शाळेतून काढून टाकेल, अशी धमकीही दिली. यामुळे पीडितेला शाळेतून काढून टाकले जाण्याची आणि बदनामी होण्याची भीती वाटल्याने तिने गप्प बसण्याचा निर्णय घेतला. पीडितेसोबत दुसरी घटना डिसेंबर २०२४ मध्ये घडली. सेंट झेवियर्स शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पीडितेने असा आरोप केला आहे की पास्टर कमलेश तिला वारंवार व्हॉट्सॲप मेसेज पाठवून पुन्हा शारीरिक संबंधांची मागणी करत होता, त्यामुळे ती कंटाळली होती. अखेर तिने संपूर्ण हकीकत त्याच्या पालकांना सांगितली, त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, भरूच बी डिव्हिजन पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.