पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी या देखील दोषी ठरल्या असून त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इम्रान खान यांना १० लाख आणि पत्नीला ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर ते दोघेही दंड भरण्यास असमर्थ ठरले तर माजी पंतप्रधानांना सहा महिने तर बुशराला तीन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा :
मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
भारतातील वाहन उद्योग १२ टक्क्यांनी वाढला
इस्कॉनचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी महाकुंभ मेळ्यासाठी दाखल
इमर्जन्सीविरोधात पंजाबमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अभियोक्ता जनरल सरदार मुझफ्फर अब्बासी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) ची टीम हजर होती. याशिवाय माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबर, पीटीआयचे बॅरिस्टर गौहर खान, शोएब शाहीन, सलमान अक्रम राजा आणि इतर वकील तुरुंगात उपस्थित होते. निकालानंतर लगेचच बुशरा बीबीला अटक करण्यात आली. इम्रान खान आधीच तुरुंगात आहेत. दरम्यान, इम्रान खान यांना कनिष्ठ न्यायालयाने ही शिक्षा दिली असून ते उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात.