28 C
Mumbai
Saturday, March 22, 2025
घरविशेषमनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार 'खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित!

मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित!

महाराष्ट्राच्या दीपाली देशपांडे, स्वप्निल कुसाळेचाही गौरव

Google News Follow

Related

ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेता नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आल. यावेळी क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.

क्रीडा मंत्रालयाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २०२४ च्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यानंतर आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ३४ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळेचाही समावेश आहे. यासह ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये स्वप्नील कुसाळे यांच्या गुरु दिपाली देशपांडे यांचाही सामावेश आहे.

२२ वर्षीय मनू भाकरने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू आहे. तर १८ वर्षीय डी गुकेश गेल्या महिन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून सर्वात तरुण बुद्धिबळ जगज्जेता ठरला. ही कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे.

दुसरीकडे, पॅरिस ऑलिम्पिकमध्येच हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. तर प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T६४ स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले.

हे ही वाचा : 

इस्कॉनचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी महाकुंभ मेळ्यासाठी दाखल

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, बीएसएफचे दोन जवान जखमी!

कानपूरमध्ये वक्फ कटाचा पर्दाफाश, १६६९ पैकी ५४८ सरकारी मालमत्तेवर कब्जा!

कोटामध्ये नीट परीक्षार्थीची आत्महत्या

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२४ 

  1. गुकेश डी (बुद्धिबळ)
  2. हरमनप्रीत सिंह (हॉकी)
  3. प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स)
  4. मनु भाकर (शूटिंग)

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

  1. ज्योती येराजी (ऍथलेटिक्स)
  2. अन्नू राणी (ऍथलेटिक्स)
  3. नितू (बॉक्सिंग)
  4. सविती (बॉक्सिंग)
  5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
  6. सलीमा टेटे (हॉकी)
  7. अभिषेक (हॉकी)
  8. संजय (हॉकी)
  9. जर्मनप्रीत सिंह (हॉकी)
  10. सुखजीत सिंह (हॉकी)
  11. राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
  12. प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)
  13. जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)
  14. अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स)
  15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)
  16. धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)
  17. प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
  18. एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
  19. सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)
  20. नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)
  21. नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
  22. सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)
  23. नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
  24. मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)
  25. कपिल परमार (पॅरा-जुडो)
  26. मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग)
  27. सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग)
  28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
  29. सरबज्योत सिंह (शूटिंग)
  30. अभय सिंह (स्क्वॅश)
  31. साजन प्रकाश (स्विमिंग)
  32. अमन (कुस्ती)

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  1. सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
  2. मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

  1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  2. दीपाली देशपांडे (शूटिंग)
  3. संदीप सांगवान (हॉकी)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  1. एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
  2. अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

मौलाना अबुल कलाम आझाद करंडक

  1. चंदीगड विद्यापीठ एकूण विजेता
  2. लवली व्यावसायिक विद्यापीठ प्रथम उपविजेता
  3. अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ दुसरा उपविजेता

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

  1. फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा