कानपूर जिल्ह्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. चार तहसीलमध्ये एकूण १६६९ मालमत्तांची ओळख पटली आहे. सदर तहसीलमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाच्या ९१४ मालमत्ता आणि ३४ शिया मालमत्ता आहेत. वक्फ बोर्डाच्या घाटमपूर तहसीलमध्ये १८९ , बिल्हौरमध्ये ३८८ आणि नरवलमध्ये १४४ मालमत्ता आहेत. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे ५४८ मालमत्ता या सरकारी मालमत्ता आहेत. या सरकारी जागेवर वक्फने कब्जा करत मशिदी आणि कब्रस्तान बांधण्यात आली आहे.
सर्वेक्षणानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. या मालमत्तांची संपूर्ण माहिती महसूल विभागाकडे नाही. जिल्हा प्रशासनाने सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. आता संयुक्त संसद समिती अहवालाचा अभ्यास करून पुढील कारवाई करणार आहे.
हे ही वाचा :
याबाबत वक्फ मालमत्ता नोडल अधिकारी डॉ. राजेश कुमार म्हणाले, वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यात १६६९ मालमत्ता आहेत. त्यापैकी ५४८ सरकारी मालमत्ता आहेत. सरकारी पथक आपल्या स्तरावर अभ्यास करून कारवाई करेल.