28.4 C
Mumbai
Tuesday, August 4, 2026
घरविशेषफुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाला एअर टर्ब्युलन्सचा तडाखा

फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाला एअर टर्ब्युलन्सचा तडाखा

प्रवासी आणि क्रू सदस्य जखमी

Google News Follow

Related

थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-२३७९ या विमानाला मंगळवारी (४ ऑगस्ट) उड्डाणादरम्यान हवेत जोरदार धक्के बसले. तीव्र वाऱ्यांमुळे विमानाला हे धक्के (एअर टर्ब्युलन्स) बसल्याने काही प्रवासी, क्रू कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले असून, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीकडे येत असताना विमानाला उड्डाणादरम्यान अचानक तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या वेळी विमानाच्या उंचीत क्षणिक बदल झाला. या धक्क्यामुळे सीटवरून उठलेले काही प्रवासी आणि ड्युटीवर असलेले काही क्रू सदस्य जखमी झाले.

विमानात १३४ प्रवासी प्रवास करत होते. विमान दिल्लीत सुरक्षित उतरल्यावर एअर इंडियाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने सर्वांची तपासणी केली. वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असलेल्या काही प्रवासी आणि क्रू सदस्यांना विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, सर्वांना किरकोळ दुखापती झाल्या असून कोणाचीही प्रकृती गंभीर नाही.

घटनेनंतर एअर इंडियाने निवेदन जारी करत, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे म्हटले. जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत दिली जात असून, या घटनेच्या तपासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

हे ही वाचा:

अभिनेत्री तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; उदयनिधी स्टॅलिन यांना घेतले ताब्यात

मोदी हे इस्रायलचे सर्वोच्च मित्र!

लग्नाची शेरवानी जाळली; इस्त्रीवाल्याला १४ हजारांचा ‘चटका’

भारतीय ‘धुरंधरां’नी ३० हून अधिक दहशतवादी टिपले

दरम्यान, काही प्रवाशांनी सांगितले की, टर्ब्युलन्सचा कालावधी सुमारे दोन ते तीन मिनिटे होता. अचानक झालेल्या धक्क्यांमुळे विमानात घबराट पसरली आणि काही प्रवासी सीटवरून उडाल्याने त्यांना दुखापत झाली. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. सध्या या घटनेचा तपास सुरू असून, टर्ब्युलन्स नेमक्या कोणत्या हवामान परिस्थितीमुळे झाला, याचा शोध संबंधित यंत्रणा घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा