30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरविशेषमिरा-भाईंदरमध्ये पुन्हा ‘आहारबंदी’चा वाद

मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा ‘आहारबंदी’चा वाद

शाळेत कांदा-लसूणही बंद!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मिरा-भाईंदरमध्ये पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर आहाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबाशी संबंधित सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारख्या कंदमुळांच्या भाज्या तसेच मांसाहारी पदार्थ आणू नयेत, अशा सूचना पालकांना दिल्याचे समोर आले आहे. पर्युषणच्या आठ दिवसांच्या काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही या पदार्थांचा वापर केला जाणार नसल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

याआधीही पर्युषण पर्वाच्या काळात मिरा-भाईंदर शहरात मांसाहाराच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारावरही अशाच प्रकारचे निर्बंध लादले जात असल्याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. विविध धर्म आणि समुदायांतील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत असताना एखाद्या धार्मिक परंपरेनुसार सर्व विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध घालणे योग्य आहे का, असा सवाल विरोधी पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
“हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान”

विजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

सावलकॉट जलविद्युत प्रकल्पाला मिळणार वेग

दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी शाळेच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसून, पर्युषण पर्वाच्या भावना लक्षात घेऊन पालकांना सूचना करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयामुळे धार्मिक भावना, वैयक्तिक आहाराची निवड आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका यावरून चर्चा रंगली आहे. मिरा-भाईंदरमध्ये यापूर्वी मांसाहाराच्या बंदीवरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता शाळेतील आहाराच्या नियमामुळे या विषयाला पुन्हा राजकीय आणि सामाजिक रंग चढला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा