ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मते रोहित शर्माने वनडेमधून निवृत्ती न घेण्याचा अर्थ असा आहे की त्यांचे लक्ष्य २०२७ वनडे विश्वचषक खेळणे हेच होय.
रोहितने भारताचा कर्णधार म्हणून दुसरे आयसीसी विजेतेपद जिंकले. दुबईत झालेल्या २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सने टीम इंडियाने पाणी पाजले होते. गेल्या वर्षी बार्बाडोसमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने टी२० फॉरमॅमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे रोहित वनडेमधून निवृत्ती घेणार अशी जोरदार चर्चा रंगली जात होती.
पण हीटमॅनने धडाकेबाज ७६ धावा करून अंतिम सामन्याचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकवला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्या सर्व चर्चानाही पूर्णविराम ठोकला. “जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर पोहोचता, तेव्हा प्रत्येकजण तुमच्या निवृत्तीची वाट पाहत असतो,” असे रोहीतने म्हटले.
पाँटिंग आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये म्हणाला, “मला माहित नाही का, जेव्हा तुम्ही अजूनही इतके चांगले खेळू शकता जसे रोहितने अंतिम सामन्यात खेळ केला. तर मला वाटते की ते फक्त त्या प्रश्नांना कायमचे संपवण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणत होते, ‘नाही, मी अजूनही चांगला खेळतो. मला या संघासाठी खेळायला आवडते. मला या संघाचे नेतृत्व करायला आवडते.’ आणि मला वाटते, त्यांनी असे म्हटल्याचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की रोहितच्या मनात पुढील ५० षटकांचा विश्वचषक (२०२७ मध्ये) खेळण्याचे लक्ष्य असले पाहिजे.”
हेही वाचा :
संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अबाज खानला अटक!
दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
हसीना शेख यांची मालमत्ता आणि नातेवाईकांसह १२४ बँक खाती जप्त करण्याचे आदेश!
त्या योद्ध्याला नमन, जो शरण गेला नाही तर मृत्यू स्वीकारला!, विकी कौशलची मानवंदना
रोहितने भारताला २०२३ पुरुष वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले होते, पण नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाकडून भारताला सहा विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
पाँटिंगच्या मते, २०२७ वनडे विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याच्या रोहितच्या निर्णयामागे अपूर्ण काम पूर्ण करण्याची भावना असू शकते. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. पाँटिंग म्हणाले, “माझ्या मते, त्यांनी मागील सामना गमावला आणि ते कर्णधार होते, ही गोष्ट त्यांच्या मनात सळ करून राहिले आहे. टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करण्याची त्यांच्यासाठी ही आणखी एक संधी आहे. मला वाटते, ज्या प्रकारे त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला, त्यावरून असे म्हणता येणार नाही की त्यांचा वेळ संपला आहे.”







