छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांनी म्हटलं की, “काही भूमिका आयुष्यभर तुमच्या मनात राहतात आणि ‘छावा’ चित्रपटात संभाजी महाराजांचं पात्र साकारणं त्यापैकी एक आहे.”
संभाजी महाराज बलिदान दिवस: एक वीरगाथा
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने क्रूरपणे हत्या केली,
कारण त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रत्येक वर्षी ११ मार्च हा ‘शंभूराजे बलिदान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
विकी कौशलने इंस्टाग्रामवर ‘छावा’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला, ज्यात ते हात वर उचलून, साखळदंडात बांधलेले उभे आहेत आणि मागे मोगल सैनिक दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “११ मार्च १६८९ – आज शंभूराजे बलिदान दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्या योद्ध्याला नमन करतो, ज्याने आत्मसमर्पणाऐवजी मृत्यू स्वीकारला, ज्याने क्रूर यातनांचा सामना केला, आपल्या विश्वासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडला आणि अमर झाला.”
“संभाजी महाराजांचं पात्र साकारणं हे केवळ अभिनय नव्हतं”
विकी कौशल म्हणाले, “काही भूमिका तुमच्यासोबत कायम राहतात आणि ‘छावा’ मध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारणं हे त्यापैकी एक आहे. त्यांची कहाणी फक्त इतिहास नाही, तर ती धैर्य, बलिदान आणि प्रेरणादायी भावना आहे, जी आजही लाखो लोकांना प्रेरित करते.”
हे ही वाचा:
सार्वजनिक निधीच्या गैरवापराप्रकरणी केजरीवालांवर गुन्हा दाखल करा
पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले महाकुंभाचे गंगाजल, मखाना आणि बनारसी साडी
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला!
वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले तर संपूर्ण देशात शाहीन बाग करू!
‘छावा’ – एक ऐतिहासिक महाकाव्य
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध ‘छावा’ या मराठी कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ मध्ये विकी कौशल यांच्यासोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि डायना पेंटी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.