33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषरंगपंचमीला गाणी लावली म्हणून हिंदू रिक्षा चालकावर हल्ला

रंगपंचमीला गाणी लावली म्हणून हिंदू रिक्षा चालकावर हल्ला

Google News Follow

Related

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात मुहाल परिसरात रंगपंचमीदिवशी रात्री धार्मिक गाणी वाजवल्याबद्दल एका हिंदू ई रिक्षा चालकावर इस्लामवाद्यांनी क्रूरपणे हल्ला चढवल्याची घटना घडली. या प्रकारानंतर दोन समुदायामध्ये हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणी कँट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ३० मार्च रोजी रात्री ११ च्या दरम्यान हा प्रकार घडला.पोलिसांनी १५ जणांना घेतले असून हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एक हिंदू ई रिक्षा चालक आणि त्याच्या मित्राने धार्मिक गाणी वाजव्ल्याबाद्द्ल इस्लामी जमावाने त्याला हे संगीत थांबवण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. ई-रिक्षा चालक आणि त्याच्या मित्राच्या बचावासाठी आलेल्या हिंदूंपैकी एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने हाणामारी जास्त प्रमाणावर उफाळली. यावेळी दगडफेकही झाली. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वज्र वाहन, राखीव पोलीस दलाचे प्रमुख, एसपी सीएसपी अतिरिक्त, पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांच्यासह चार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. लाठीचार्जही केला. यानंतर पोलिसांनी रविवारी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना ओळखण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने परिसरात १४४ कलम लागू केले आहे. पोलिसांनी परिसरात मेळाव्यास, सभेस बंदी घातली आहे.

हे ही वाचा:

‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’

वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर १० वर्षीय मुलीचा मृत्यू

अरविंद केजरीवाल यांचे असहकार धोरण

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा; मविआ आटोपल्याची पोचपावती

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते आणि हिंदू कार्यकर्ते पोलिस ठाण्यात पोहोचले. याबाबत भाजप आमदार प्रदीप लारिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ही गंभीर बाब आहे. माझा विश्वास आहे की हा पूर्वनियोजित हल्ला होता. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, तरीही कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही देत ​​नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा