26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषभारतातील घडलेले १० भीषण विमान अपघात

भारतातील घडलेले १० भीषण विमान अपघात

Google News Follow

Related

अहमदाबादमध्ये गुरुवारी घडलेला एअर इंडिया विमान अपघात पुन्हा एकदा देशातील विमानसेवा आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करतो. याआधीची शेवटची मोठी दुर्घटना २०२० मध्ये कालीकटमध्ये घडली होती, ज्यात २१ लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, भारतातील सर्वात मोठी दुर्घटना १२ नोव्हेंबर १९९६ रोजी चरखी दादरी येथे घडली होती, ज्यात ३४९ लोक मृत्युमुखी पडले.

गेल्या काही दशकांत भारतात घडलेल्या महत्वाच्या नागरी विमान अपघातांची यादी पुढीलप्रमाणे: कालीकट (कोझिकोड) विमान अपघात (७ ऑगस्ट, २०२०), दुबईहून येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे फ्लाइट १३४४ कोझिकोड विमानतळावर उतरतानाच धोकादायक रनवेवर घसरले आणि दोन तुकड्यांत तुटले. यात २१ लोकांचा मृत्यू झाला.
मंगळुरू विमान अपघात (२२ मे २०१०)
एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ८१२ रनवेवरून घसरली आणि खडडीत कोसळून १५८ लोकांचा मृत्यू झाला.
पटणा विमान अपघात (१७ जुलै २०००)
एलायन्स एअर फ्लाइट ७४१२ उतरते वेळी कोसळले, ६० हून अधिक लोक मारले गेले. पायलटच्या चुकांमुळे ही दुर्घटना घडली.

हेही वाचा..

बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांच्या घरावर हल्ला!

आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस

डिनो मोरिया ईडीसमोर हजर

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले
चरखी दादरी हवेत धडक (१२ नोव्हेंबर १९९६)
सौदी अरब एअरलाईन्सचे बोईंग ७४७ आणि कझाकस्तान एअरलाईन्सचे इल्यूशिन IL-७६ दिल्लीजवळ हवेत एकमेकांवर धडकले, सर्व ३४९ प्रवासी ठार.
औरंगाबाद विमान अपघात (२६ एप्रिल १९९३)
इंडियन एअरलाईन्स फ्लाइट ४९१ बोईंग ७३७ औरंगाबादहून उड्डाण करताना ट्रक आणि विजेच्या तारांवर आदळले, ५५ लोक मृत.
इंफाळ विमान अपघात (१६ ऑगस्ट १९९१)
इंडियन एअरलाईन्स फ्लाइट २५७ इंफाळजवळ कोसळली, सर्व ६९ प्रवासी ठार.
बेंगळुरू विमान अपघात (१४ फेब्रुवारी १९९०)
इंडियन एअरलाईन्स फ्लाइट ६०५ (एअरबस A३२०) बेंगळुरूजवळ कोसळली, ९२ जणांचा मृत्यू.
अहमदाबाद विमान अपघात (१९ ऑक्टोबर १९८८)
इंडियन एअरलाईन्स फ्लाइट ११३ अहमदाबादमध्ये कोसळले, १३३ लोक मृत.
बॉम्बे विमान अपघात (२१ जून १९८२)
एअर इंडिया फ्लाइट ४०३ मुंबई विमानतळावर कोसळले, १७ लोक मृत.
बॉम्बे एअर क्रॅश (१ जानेवारी १९७८)
एअर इंडिया फ्लाइट ८५५ (बोईंग ७४७) मुंबईहून उड्डाण केल्यानंतर अरबी समुद्रात कोसळले, २१३ लोकांचा मृत्यू.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा